Dairy Farming Information 2024 भारतामध्ये दुध व्यवसाय पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो परंतु बदलत्या काळानुसार या व्यवसायाने आता संपूर्ण रूप बदलले, आहे यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर होऊ लागलेला आहे, यामुळे डेअरी फार्म व्यवसायला अधिक गती प्राप्त झाले आहे तसेच नव्या टेक्नॉलॉजीमुळे या व्यवसायात नफा वाढलेला आहे त्यामुळे आजची नवी तरुण पिढी या व्यवसायाकडे वळत आहे.
कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हटले की त्यासाठी एक विशिष्ट ध्येय ठेवणे गरजेचे असते आणि ते धरूनच जर व्यवसायाला सुरुवात केली तर अधिक प्रगती होतो तसेच डेअरी व्यवसायाचे आहे व्यवसायामध्ये एक विशिष्ट ध्येय ते निश्चित करून त्याप्रमाणे त्या व्यवसायाची वाटचाल करणे आवश्यक असते.
डेअरी फार्म व्यवसाय म्हणजे दूध देणाऱ्या गाई म्हशीचे पालन करून त्यापासून दूध उत्पादन करणे व ते दूध डेअरीला घालणे किंवा त्यापासून विविध बायप्रॉडक्ट बनवणे त्यालाच डेअरी व्यवसाय म्हणतात.
आज आपण या लेखामध्ये डेअरी फार्मबद्दल माहिती पाहणार आहोत यात डेअरी काम व्यवसाय कसा करायचा त्याचे फायदे तोटे डेअरी फार्म व्यवसायासाठी लागणारी जनावरे त्यांच्या जाती इत्यादीचा अभ्यास करणार आहोत.
डेरी फार्मिंग प्रोजेक्ट सुरू करत असताना किंवा तो सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये अधिक तोटा होऊ नये किंवा अधिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी डेअरी फार्मिंग इन्फॉर्मेशन घेणे गरजेचे आहे,तर आपण व्यवसाय सुरू करण्याआधीच डेअरी फार्मिंग प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन घेतली तर या व्यवसायात आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही.
तसेच या व्यवसायासाठी डेअरी फार्म लोन कोठे भेटेल तसेच डेरी फार्मिंग प्रोजेक्ट कसा तयार करावा याविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
व्यवसायात उतरण्यापूर्वी भारतातील प्रसिद्ध अशा अमृत डेअरी फार्म,मॉडर्न डेअरी फार्म, सागर डेअरी फार्म, अमूल डेअरी फार्म इत्यादी डेअरी फार्म चा अभ्यास ही करावा.
या व्यवसायात उतरण्यापूर्वी आपल्या आसपास व्हेरी डिप्लोमा असेल तर त्याची डेअरी डिप्लोमा माहिती घ्यावी या डेरी डिप्लोमा मध्ये डेअरी उद्योग अधिक उलघडून शिकवला जातो त्यामुळे डेअरी मिल उत्पादन कसे घ्यावे याची माहिती मिळून जाते.
डेअरी उद्योजक्ता विकास योजनेअंतर्गत कुठले डेअरी फार्म लोन मिळते का तेही पाहून आपण या व्यवसायात उतरावे.
आपली आर्थिक प्रगती तर होतेच त्याचबरोबर त्याचे अनेक फायदे आहेत या व्यवसायामुळे वाढत चाललेली दुधाची कमतरता भरून येते.
घटत चाललेली जनावरांची संख्या वाढ होण्यास मदत होते .
तसेच खालील मुख्य फायदे दिसून येतात
शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होते व शेतीस जोडधंदा प्राप्त होतो.
व्यवसायिक स्वरूपात करता येतो.
डेअरी फार्मिंग मध्ये दूध विक्री बरोबरच प्राप्त होणाऱ्या शेनाचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी करता येतो.
हा व्यवसाय वर्षभर चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे आर्थिक प्राप्ती वर्षभर होते.
स्वतःच्या मालकीच्या पडीक जमिनीचा वापर डेरी फार्मिंग साठी करता येतो.
व्यवसायासाठी बँकेमार्फत डेअरी फार्मिंग लोन सहज मिळून जाते त्यामुळे स्वतःचे भांडवल लावण्याची गरज नाही.
या व्यवसायाच्या वाढीसाठी शासन विविध डेअरी फार्मिंग लोन योजना राबवत आहे त्यामुळे या योजनांचा फायदा घेऊन भरपूर मोठ्या प्रमाणात सबसिडीचा ही फायदा घेता येतो.
या व्यवसायाला पूरक असे डेअरी प्रॉडक्ट चा व्यवसाय चालवता येतो.
तसेच आपल्या व्यवसायातील असणाऱ्या जनावरंपासून होणाऱ्या वासरांची विक्री करून अधिकचे आर्थिक प्राप्ती होते .
स्वतंत्र व्यवसाय म्हणून तसेच शेतीला जोड धंदा म्हणूनही करता येतो भारतामध्ये हा व्यवसायत आता बदल झालेला आहे, फार्मिंग बिझनेस मॉडेल नवीन स्वरूपा आले आहे,पारंपारिक पद्धत सोडून Dairy farmers of America या पद्धतीचा वापर करून यामध्ये सुधारणा घडवून येत आहे यात आपण पाच जनावरापासून सुरुवात करून ते यात पाचशे ते हजार जनावरापर्यंत वाढ करू शकतो व आपल्या व्यवसायाला एक मोठे स्वरूप देऊ शकतो.
देशात वाहतूक व्यवस्था अधिक तेज झाल्यामुळे या व्यवसायातही तेजी आलेली आहे व्यवसायात दुधापासून होणारे बायप्रॉडक्ट तयार करून आपण जलद गतीने संपूर्ण भारतात वितरित करू शकतो
डेअरी फार्मिंग करण्यापूर्वी किंवा या उद्योगात येण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते त्या गोष्टी खालील प्रमाणे,
या व्यवसायात येण्यापूर्वी सुरुवातीला स्वतःचे भांडवल किती आहे व आपल्याला बँकेमार्फत किती डेअरी फार्मिंग लोन होणार आहे किंवा यासाठी कुठल्या शासकीय डेयरी फार्मिंग लोन योजना आहेत का ते तपासून पहावे.
जर आपण स्वतःच्या जागेत हा व्यवसाय करणार असेल तर सर्वप्रथम त्या जागेची निवड करावी तेथे असणारे चारा पाणी याची उपलब्धता तपासून घ्यावी.
डेयरी फार्मिंग व्यवसाय सुरू झाल्यानंतर यातून जी दूध निर्मिती होते ती वितरित करण्यासाठी जवळचे मार्केट कुठले आहे याचा अभ्यास करावा.
या व्यवसायासाठी लागणारा मजूर पुरवठा आपल्याला होईल का हेही याप्रमाणे विचारात घ्यावे.
या व्यवसायासाठी लागणाऱ्या चारा आपल्याला उपलब्ध होईल का हे आधी तपासून घ्यावे.
या व्यवसायासाठी लागणाऱ्या गाय म्हैस यांच्या अधिक दुध देणाऱ्या जातीचा अभ्यास करून त्या कोठे मिळतील हे तपासून पहावे.
हा व्यवसाय बहुदा शेतीबरोबर एक ते दोन जनावरे पाळून केला जातो हा व्यवसाय विशिष्ट नियोजनाने केला जात नाही
तिथे उपलब्ध असणाऱ्या चारा किंवा बांधावरील गवत इत्यादी उपलब्ध साधनाच्या आधारे हा व्यवसाय केला जातो
बहुतेक शेतकरी आपल्या शेतात शेतीबरोबर एक ते दोन जनावरे पाळतात त्याचा उद्देश नफा मिळवणे नसून आपल्या दैनंदिन आरती गरजा भागवणे हा असतो
उपलब्ध दुधापैकी घरी वापरून राहिलेले दूध विक्री करून जे पैसे येतील त्यातून हे आपल्या घरातील आर्थिक गरजा भागवत असतात यात मुख्यतः लोकल जातीच्या जनावरांची पालन केले जाते.
जनावरांच्या जातीकडे विशेष लक्ष दिले जात नाही उपलब्ध असणाऱ्या जाती खरेदी करून त्या शेतात पाळल्या जातात व त्यातून उपलब्ध होणारे दूध प्राप्त केले जाते त्यामुळे या व्यवसायात जास्त असा नफा प्राप्त होत नाही.
या व्यवसाया प्रकारात फारशी गुंतवणूक नसते त्यामुळे नफाही कमी असतो यात दिवसाला पाच ते दहा लिटर दूध उत्पादन होते.
मध्यम दुग्ध व्यवसाय म्हणजे व्यवसाय उद्योग करण्याच्या दृष्टीने सुरुवात केलेला व्यवसाय असतो यासाठी कमी भांडवल असणारे व्यक्ती Medium size dairy farm व्यवसायाची सुरुवात करतात व नंतर हळूहळू प्रमाणात भांडवल वाढवून या व्यवसायाला मोठे स्वरूप दिले जाते.
मध्यम दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच ते दहा लाखाचे भांडवली गुंतवणूक करावी लागते.
यामध्ये विविध शासकीय योजना चार लाभ घेता येतो तसेच बँकेमार्फत कर्ज पुरवठा हे केला जातो.
यामध्ये पाच ते दहा जनावरांचा समावेश असते मग त्या गाई किंवा म्हशी असू शकतात .
आपल्या प्रदेशाच्या उपलब्धतेनुसार अधिक दूध देणाऱ्या गाई व म्हशीच्या जाती निवडून त्या व्यवसायात आणल्या जातात व त्यापासून नफा प्राप्त केला जातो .
यासाठी विशेष नियोजनाची गरज असते तसेच या व्यवसायात मध्यम भांडवल गुंतवणूक असल्यामुळे मध्यम नफा प्राप्त होतो.
परंतु या व्यवसायात काही काळ गेल्यानंतर या व्यवसायाची वाढ करता येते यात मुख्यत्वे दिवसाला 100 ते 200 लिटर दूध उत्पादन होते व यातून महिना दोन लाखापर्यंत नफा प्राप्त करू शकता.
ज्या व्यक्तीची भांडवली क्षमता अधिक आहे ती व्यक्ती किंवा शेतकरी सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून 50 ते 100 म्हशीचा गोठा तयार करून या व्यवसायात उतरते .
यासाठी ज्याप्रमाणे भांडवली गुंतवणूक अधिक असते त्याप्रमाणेच या व्यवसायात नफाही अधिक असतो.
हा व्यवसाय देखील शासकीय योजनेचा लाभ घेऊन किंवा बँकेचे कर्ज घेऊन करता येतो .
यासाठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत तसेच बँक कर्जही मंजूर होऊन करता येते.
हा व्यवसाय मुख्यता होणाऱ्या दूध उत्पादनातून विविध बाय प्रॉडक्ट म्हणजे मिल्क प्रॉडक्ट बनवले जातात व त्यांची पॅकिंग करून ते मार्केटमध्ये विक्री केले जातात .
यात दिवसाला हजार ते दीड हजार लिटर दूध उत्पादन होते या व्यवसायात अधिक नियोजनाची गरज असते.
डेयरी फार्मिंग व्यवसायात जर यशस्वी व्हायचे असेल तर यामध्ये जर आपण गाई पाळणार असाल तर त्या गाईंचा सुरुवातीला अभ्यास असणे गरजेचे आहे.
त्याप्रमाणे योग्य जातीच्या अधिक प्रमाणात दूध उत्पादन देणाऱ्या गाईंची निवड करणे गरजेचे आहे.
त्या निवड करताना त्यांची जात आरोग्य प्रदेश यांचा अभ्यास करून निवडावे म्हणजे हा व्यवसाय अधिक यशस्वी होइल.
जास्त दूध देणाऱ्या गाई च्या जाती कोठे मिळतात ते पाहून तेथून त्या जनावरांची खरेदी करावे मुख्यतः डेअरी फार्मिंग व्यवसायासाठी खालील गाईंच्या जातीची निवड केली जाते.
जात | मूळ प्रदेश | दूध देण्याचा कालावधी | सरासरी दूध उत्पादन |
देवणी | महाराष्ट्रात लातूर बीड नांदेड | ३०० दिवस | 1100 लिटर |
गीर | गुजरात गीर टेकड्या | 300 दिवस | 2100 लीटर |
सिंधी | हैद्राबाद | 280 दिवस | 2300 लिटर |
गोळाऊ | महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील काही भाग | 260 दिवस | १५०० लिटर |
जात | मूळ प्रदेश | दूध देण्याचा कालावधी | सरासरी दूध उत्पादन |
जर्सी | इंग्लीश खाडीतील जर्सी बेट | 300 दिवस | 4000 लिटर |
एच एफ/HF | हॉलंड | 300 दिवस | 6000 लिटर |
ब्राऊन स्विस | स्वित्झर्लंड | 300 दिवस | 6000 लिटर |
जगामध्ये सर्वात जास्त मशीनची संख्या भारतामध्ये आहे म्हैस पालनामध्ये भारत हा एक नंबर देश आहे
भारतात एकूण म्हशीच्या 26 जाती आहेत त्यापैकी बारा जातीची नोंद आहे की त्या जाती दूध व्यवसायामध्ये जास्त दूध देणाऱ्या जात म्हणून ओळखल्या जातातभारतात उत्तर प्रदेशात सर्वाधिक जास्त मशीन आहे
जात | मूळ प्रदेश | दूध देण्याचा कालावधी | सरासरी दूध उत्पादन |
मुर्रा म्हैस | हरियाणामध्ये रोहतक,हिसार आणि जिंद जिल्हा पंजाब मध्ये नाभा आणि पटियाला जिल्हा | 300 दिवस | 1850 लिटर |
पंढरपुरी म्हैस | महाराष्ट्रात सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यातव पंढरपूर या शहरात | 305 दिवस | १७०० ते १८०० लिटर |
सुरती म्हैस | गुजरात राज्यामध्ये खेडा आणि बडोदा जिल्ह्यात आणि सुरत शहरात | 280 दिवस | 900 ते 1300 लिटर |
मेहसाणा म्हैस | गुजरात च्या मेहसना जिल्ह्यात व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात | 260 दिवस | 1200 ते 1500 लिटर |
चिलका म्हैस | ओरिसा राज्यातील कटक ,गंजम , खुर्दा आणि पूरी जिल्ह्यात | 280 दिवस | 1300 ते 1400 लिटर |
डेअरी फार्मिंग व्यवसाय यशस्वी करण्याची पहिली पायरी म्हणजे गाई म्हशी खरेदी करताना घेतलेली काळजी.
आपण जिथे हा व्यवसाय करणार आहोत तेथील वातावरणात सूट होणाऱ्या गाई म्हशी खरेदी करावे.
गुरांची खरेदी करताना प्रत्येकाची दूध उत्पादन क्षमता वेगवेगळी असते ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे खरेदी करावी.
गाई म्हशी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आढळून येते त्यामुळे निरोगी व दुधाची खात्री घेऊनच जनावरांची खरेदी करावी.
उच्च प्रतीच्या जातीच्या जनावरांचे खरेदी कधीही दूध व्यवसायात फायदेशीर ठरते.
खरेदी करण्यापूर्वी किंवा खरेदी करताना सोबत एखादा पशु तज्ञ किंवा पशुवैद्यकीय विशेषतज्ञ सोबत घेऊन जावे त्यामुळे जनावरांच्या खरेदी फसवणूक होणार नाही.
डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये ज्या महिन्यात जनावर येणार आहे त्यापूर्वीच चारा लागवड करणे आवश्यक असते.
दूध व्यवसायात पुढील एक ते दीड वर्ष पुरेल एवढ्या चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे असते किंवा तेवढा चारा आपल्याकडे शिल्लक असणे आवश्यक आहे.
पावसाळ्याच्या काळात अतिरिक्त हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवून तो साठवून ठेवणे हाही चारा नियोजनाचा एक भाग आहे यामुळे दुष्काळी काळात याचा वापर करता येतो.
दर्जेदार दूध उत्पन्नासाठी हिरवा चारा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हिरवा चाऱ्याचा नियोजन करणे आवश्यक आहे,त्यांच्याकडे बारा महिने हीरवा चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे, जनावरांनी भरपूर प्रमाणात दूध देण्यासाठी व त्यांचा आरोग्य निरोगी राहण्यासाठी हिरवा चारा खूप महत्त्वाचा आहे.
दहा लिटर दूध क्षमता असणाऱ्या एका गुरांसाठी अंदाजे आठ ते नऊ किलो वाळलेला चारा आणि 25 ते 26 किलो हिरवा चारा दररोज देणे आवश्यक आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने उगवण्यात येणारी पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स ही पद्धत अवलंबून ही मातीशिवाय चारा निर्मिती केल्या जाऊ शकतो त्यामुळे चारा टंचाई भासणार नाही.
अझोला की एक सेवाळ वर्णीय वनस्पती आहे, नजदीकच्या काळात याचा दूध देणाऱ्या जनावरांसाठी वापर वाढला आहे, ही एक बहुगुणी वनस्पती आहे याच्या वापराने दुधाचे उत्पादन वाढलेले दिसून आले आहे, याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत त्यामुळे अझोला चाऱ्यास उत्तम पर्याय आहे.
हा गोटा पूर्णतः बंदिस्त असतो यामध्ये नवीन टेक्नॉलॉजिचा वापर करतो जसे की दूध काढणी यंत्र जनावरांना धुण्यासाठी मशीन वातावरण कुल करण्यासाठी विविध फोगरचा वापर.
हा गोठया चे पूर्णता आधुनिक तंत्रज्ञान यावर बांधकाम केलेला असतो.
या गोट्यामुळे जनावरांचे पूर्णतः सुरक्षितता होते वन्य प्राण्यापासून कुठलाही धोका नसतो.
यामुळे जनावरावर वेळोवेळी लक्ष ठेवता येते व योग्य पद्धतीने चारा नियोजन व पाण्याचे व्यवस्थापन करता येते.
प्रत्येक गुरांकडे जातीने लक्ष घालता येते त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपता येतात.
बिग डेअरी फार्मिंग मध्ये हा गोठा खूप फायदेशीर ठरतो.
यामधील गुरे संपूर्ण काळ बांधून असतात त्यांना मोकळे सोडले जात नाही त्याप्रमाणेच अनुकूल जातींची निवड केली जाते.
यामध्ये गुरांसाठी सेड बांधले जाते त्याबरोबरच त्यांना काही काळ मोकळे सोडले जाते त्याला अर्धबंदिस्त गोठा म्हणतात.
बंदिस्त गोट्यावरील होणारा जास्तीचा खर्च टाळण्यासाठी अर्धबंदिस्त गोठा बांधला जातो.
अर्धबंदिस्त गोठ्यात जनावरे खाण्यापुरती शेडमध्ये असतात व खाणे झाल्यानंतर त्यांना मोकळे सोडले जाते.
यामध्ये सर्व जनावरे मिक्स असल्याकारणाने रेतन करण्यासाठी फायदेशीर ठरते.
यासाठी जास्त जागेचा वापर होतो.
मुक्त संचार गोठा म्हणजे यामध्ये गुरांना पूर्णपणे मुक्त सोडले जाते.
त्या गोट्याचा मुख्य फायदा असा होतो की कन्स्ट्रक्शन वरील खर्च पूर्णतः कमी होतो.
यामध्ये जनावरांना एका मोठे कंपाउंड बांधून त्यामध्ये पाण्याची व चाऱ्याची सोय केली जाते.
गुरे जेव्हा वाटेल तेव्हा चारा खातात व जेव्हा वाटेल तेव्हा पाणी पितात यामुळे दूध उत्पादन वाढल्याचे दिसून येते.
यामध्ये मजुरा वरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होतं त्यामुळे ज्यांना मजुरांचे टंचाई आहे ते या पद्धतीचा वापर करू शकता.
हे सर्व झाल्यानंतर आपल्या डेरी फार्म रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते यासाठी खालील रजिस्ट्रेशन लागतात.
पंचायत समिती मार्फत विविध डेअरी फार्म गुण मिळतात यामध्ये दोन ते दहा म्हेस किंवा गाय पाळण्यासाठी लोन मिळते त्यासोबतच जिल्हा पशू विभागामार्फत विविध लोन मिळतात तसेच नाबार्ड अंतर्गत विविध लोन साठी dairy farm subsidy सबसिडी मिळते.
हो हा फायदेशीर व्यवसाय आहे योग्य पद्धतीने नियोजन करून हा जर व्यवसाय केला तर आपण यातून अधिक आर्थिक प्रगती करू शकतो यासाठी काही प्राथमिक शिक्षण घेणे गरजेचे आहे त्यामुळे या उद्योगात आपला यश प्राप्त होईल.
याची सुरुवात गोठ्यापासून चालू होते सुरुवातीला काही गुरांचे पालन करून त्यापासून होणारे दूध उत्पादन हे मिल्क प्लांट मध्ये येते व तेथून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती होते व पॅकेजिंग करून ते मार्केटमध्ये विक्री येतात.
यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात यामध्ये गुरांची खरेदी चारा नियोजन गोठा बांधणी व आजारांचे योग्य नियोजन जनावरांचे स्वच्छता इत्यादी पद्धती वापरून यश मिळवले जाते.
डेअरी फार्म साठी आपल्याला आवश्यक आहे तेवढे लोन मिळते त्यासाठी आपल्याला काही कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक असते.
होय डेअरी फार्म साठी विविध शासकीय योजना आहेत त्या मार्फत आपणास गाई व म्हशी पाळण्यासाठी अनुदान मिळते.
वरील लेखांमध्ये आपण दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर आहे आपण सविस्तरपणे पाहिले नाही याचा आधारे आपण आपला दुग्ध व्यवसाय सुरू करू शकता उपलब्ध स्थानिक स्त्रोत व इतर माहितीच्या आधारे सर्व माहिती आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा मुख्य उद्देश आहे या मार्फत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नवीन माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे जर सदरील लेखात काही अडचणी असतील तर आपण आम्हाला आमच्या मी ईमेल आयडीवर कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवून कळवू शकता.